विधिलिखित घडलेच नाही!
मणिपूरचा राजा चंद्रसेन याचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास होता. त्याने शेजारच्या राज्यावर स्वारी करायचे ठरवून ज्योतिषाला भविष्य वर्तवण्यास सांगितले.
ज्योतिषाने राजाची जन्मकुंडली पाहिली व म्हणाला— "महाराज! या वर्षी आपली ग्रहदशा चांगली नाही. शत्रूकडून पराभवाची लक्षणे आहेत."
राजाने कोणाला ते कळविले नाही व कोठेही स्वारीवर गेला नाही.
एक वर्ष लोटले. मंत्र्याने राजाला ज्योतिषाने वर्तवलेल्या भविष्याची आठवण करून दिली व म्हणाला— "महाराज, आपण ज्योतिषांवर कधी विश्वास करू नका. गेल्या वर्षात आपला शत्रूकडून पराभव होईल असे भविष्य ज्योतिषाने वर्तवले होते. परंतु आपण युद्धच केले नाही आणि आपला पराभवही झाला नाही."
तेव्हापासून राजाचा ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास उडाला.