Bookstruck

भांडणे मिटली

गौरी व गणपती दोघांनी ज्या दिवशी संसार थाटला त्या दिवसापासूनच दोघांची परस्परांशी भांडणे सुरू झाली. भांडणाला कारणे तशी फार मोठी नव्हती. आज भाजी कोणती करावी, कोणत्या देवळात जावे अशाच लहानसहान गोष्टीवरून दोघांची भांडणे होत. एकदा दोघांना आपले बिऱ्हाड बदलावे लागले. गणपतीने खूप हिंडून फिरून शेवटी एक घर गावाच्या अगदी टोकाला ठरविले. दोघांनी सुमुहूर्तावर गृहप्रवेश केला. एकदा गणपती ऑफिसातून घरी परत येताना भाजी विकत घेऊन आला. जेवताना दोघांचे भांडण सुरू झाले की दुसऱ्या दिवशी सकाळी कोणती भाजी करावयाची? गौरी म्हणाली— "तोंडल्याची भाजी करू या. परंतु गणपतीने हट्ट धरला की भेंडीची भाजीच तिने केली पाहिजे." Gauri chidun mhnaali – "मी काही म्हटलं की त्याच्या विरुद्ध बोलण्याचं तुम्ही जणू काही व्रतच घेतलं आहे." "मी म्हटलेलं तू कधी ऐकलं आहेस का?" गणपतीने उलट प्रश्न विचारला. इतक्यात कोणीतरी दाराची कडी वाजविली. गणपतीने पुढे होऊन दार उघडले. बाहेर कोणी भिकारी चांदण्यात दिसला. त्याच्या हातात चोपडी होती. तो गणपतीला म्हणाला— "मालक, तुम्हांला दोघांना मी केव्हापासून भांडत असलेला ऐकतो आहे. भांडणाची गरजच काय? दोघांना आवडणाऱ्या दोन्ही भाज्या एकदम करा!" "तुला कोणी रे, मध्ये तोंड खुपसायला सांगितलं? आधी चालता हो!" गणपती ओरडला. "थांब रे, बाबा, मी वाढते आहे ते घेऊन जा!" गौरी म्हणाली आणि तिने त्याच्या झोळीत भात व भाजी घातली. "ताई, उगाच एवढ्याशा गोष्टीवरून दोघं का भांडता? उद्या तुम्ही दोघं लग्नाघरीच राहणार ना? दिवसा लाल साडी नेसा व रात्री हिरवी, भांडण हवंच कशाला?" भिकाऱ्याने सल्ला दिला. "तू कोण रे, मध्ये तोंड खुपसायला? आम्ही आमचं पाहून घेऊ, चालू लाग!" गौरी संतापून म्हणाली. "थांब रे, बाबा!" असं म्हणत गणपतीने खिशातून काही पैसे भिकाऱ्याच्या भांड्यात टाकले. भिकारी निघून गेला. दुसऱ्या दिवशी गौरीने दोन भाज्या केल्या. त्या दिवशी जेवताना दोघांचं भांडण झालं नाही. परंतु त्या दिवशी दोघा नवरा-बायकोचं त्यांच्या एका मित्राच्या घरी लग्नाला जाण्यासंबंधी भांडण झालं. गणपती म्हणाला— "तू हिरव्या रंगाची साडी नेस. तो रंग मला आवडतो." "नाही, मी लाल साडीच नेसून येणार आहे. मला तीच आवडते." गौरी म्हणाली. "चल ग! हे काय, तुझं डोकं-बिकं फिरलं आहे की काय? कोणी मुलगी व्हावी म्हणून इच्छिल का? हल्ली 'नको नको' म्हणणाऱ्यांना मुलीच होताहेत! मुलगी झाली तर किती संकटांना तोंड द्यावे लागेल, तुला कल्पना तरी आहे का? तिच्यासाठी योग्य वर शोधावा लागेल. मोठा हुंडा देऊन तिचं लग्न करून द्यावे लागेल. इतकं सर्व करून ती परक्या घरचीच तर राहणार! या उलट मुलगा जन्मला तर तो म्हातारपणी आपलं रक्षण करील." गणपती म्हणाला. या गोष्टीवरून दोघांचं भांडण सुरू झालं. या खेपेसही दाराची कडी पुन्हा वाजली. गणपतीने दार उघडून विचारलं— "काय रे, तू आम्हांला सल्ला द्यायला पुन्हा आला आहेस वाटतं?" त्यानंतर समोर उभा असलेल्या माणसाकडे पाहून गणपती दचकला. कारण तो कचेरीचा शिपाई सदाशिव होता. "मला पाहून तुम्हाला कोणी दुसराच वाटलं होय? आज तुम्ही कचेरीत आला नाहीत, तुमचे कर्जाचे पैसे परत द्यायला आलो आहे. हे घ्या!" सदाशिव म्हणाला आणि गणपतीच्या हातात एक पाकीट देऊन निघून गेला. Sadaashiv nighun gelyaavar Ganpati daar band karu laagla tevhaach bhikaari pudhe yeun mhnaala – "मालक, एक विनंती करावी म्हणतो! तुम्ही दोघं मुलगा हवा की मुलगी या गोष्टीवरून भांडत होता ना? आता पलीकडच्या गल्लीत केशवरावांची बायको आणि नथुराम कासाराची बायको पोटात दुखत आहे म्हणून रडत आहेत. तुम्ही कोणाला मुलगा आणि कोणाला मुलगी होईल, हे बरोबर सांगितलेत तर तुमचं भांडण कायमचे मिटेल." ते ऐकून गौरी ओरडली— "केशवरावांना मुलगी होणार." परंतु गणपती म्हणाला— "नथुराम कासाराला मुलगा होणार." त्या दिवशी रात्री गणपती, केशवरावांची बायको व नथुराम कासाराची बायको बाळंत होईपर्यंत जागत बसला. परंतु झालं उलटं, केशवरावाला झाला मुलगा आणि नथुराम कासाराला झाली मुलगी. भिकारी हसत येऊन म्हणाला— "पाहिलंत? तुम्ही दोघं म्हणालात त्याच्या उलटच झालं. कोणाला मुलगा होणार आणि कोणाला मुलगी, ही सर्व सृष्टीची माया आहे. सृष्टीच्या नजरेत पुरुष किंवा स्त्री दोघे सारखेच असतात. म्हणून तुम्ही यापुढे उगाच भांडायचं सोडून द्या. परस्परांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि सुखी व्हा. असं राहिलात तरच आयुष्यभर सुखी व्हाल. मी जिवंत असेपर्यंत कित्येक कुटुंबांत सुधारणा आणून दिली. आजसुद्धा तीच इच्छा माझ्या मनात आहे, म्हणून मी या रूपात फिरतो आहे." तो म्हणाला ते ऐकून नवरा-बायको घाबरली. त्यांना वाटलं की घेरी येऊन खाली पडणार. परंतु जेव्हा दोघं शुद्धीवर आली तेव्हा त्यांना समोर तो भिकारी दिसला नाही. ती गोष्ट घडली त्या घटकेपासून दोघांच्या मनात सदा भीती असे की तो भिकारी येतो की काय? त्यांचं घर गावाच्या टोकाला होते. चहूकडे गडद झाडी होती. घर बदलण्याची इच्छा असूनही ते साध्य नव्हते. म्हणून त्या भूताच्या भीतीने त्यांनी आपसात भांडायचे सोडून दिले. त्यानंतर त्यांना मानवी जीवन किती सुख देणारे आहे, याचा अनुभव आला. त्या आनंदात काही दिवस लोटले व हळूहळू भूताची गोष्टच ते विसरले. नंतर त्यांना ते भूत कधी दिसलंच नाही.