All Marathi Stories

आरोग्याची गुरुकिल्ली

गुरुनाथला पडसं झालं. गळा जड होऊन आवाजही नीट निघत नव्हता. पुन्हा-पुन्हा नाक शिंकावं लागत होतं. अन् डोळे पुसावे लागत होते. डोही दुःखात होते. त्यामुळे कपाळ दोन्ही बाजूंनी दाबावं लागत होतं. जेवण तर केलं, पण ताप आल्यासारखा वाटत होता. हे सारं सहन होईनासं झाल्यामुळे त्यानं आपल्या मुलाला वैद्याकडे पाठवलं. वैद्यानं काही गोळ्या दिल्या. त्या खाल्ल्यावर ताप कमी झाल्यासारखं वाटलं, पण बाकीच्या लक्षणांत काहीच फरक पडला नाही. संध्याकाळी तो स्वतःच वैद्याला भेटायला निघाला. वाटेनं तो शिंकत होता; वारंवार खोकलाही येत होताच. दोन-ठिकाणी कट्ट्यावरही विश्रांतीसाठी थांबला तो. त्याची अवस्था पाहून अनेकांनी सहानुभूती दाखवली. वैद्याकडे पोचताच तो म्हणाला, "अरे, तुम्हीच चालत आलात?" अन् नंतर त्यानं आजाराबद्दल विचारून घेतलं. "तुमच्या मुलानं सांगतवार सांगितलं नाही!" असं म्हणत त्यानं नाडी-परीक्षा केली. एक नवे औषध सांगून मात्रा देत म्हटले, "आता एक आठवडाभर पोटभर जेवा आणि विश्रांती घ्या. पडसं कमी होण्यासाठी ही मात्रा रहायला हवी." पडसं कमी झालं नाही तोच गुरुनाथ पाय घसरून अन् गुडघ्यात लचक भरली. बायकोनं गरम फडक्यानं शेक दिला, वैद्यानं लेप लावला. गावच्या गणाच्चानं येऊन सहानुभूती दाखवत सांत्वन केले. या घटनेनंतर पंधरा दिवसांनी गुरुनाथच्या कानात दुखू लागलं. तीन दिवस ठणका लागला होता. नंतर पोट दुखलं अन् छातीतही वेदना होऊ लागल्या. त्याला तर वाटलं की आपल्याला हृदयविकाराचा झटका आलाय. पण वैद्यानं तपासून 'तसं' काही नसल्याचं सांगितलं. वातमुळे तसं झाल्याचं म्हणाला वैद्य. आता कुठं सर्वांना 'हुश' झालं! वर्षभर मधून असंच काही-काही होत राहिलं. गावचे लोक गुरुनाथला सहानुभूती दाखवत राहिले. ही बातमी त्याच्या मेहुणा शंभर याच्या कानी गेली. अन् तो गुरुनाथला भेटायला आला. त्याने म्हटले मेहुणतच बयामुळे असे आजार होतात मला! दिवसेंदिवस माझी तब्येत बिघडत चाललीय." "अरे, असं काय बोलताय तुम्ही? म्हातारे थोडेच झालाय? पन्नास वर्षांचे तर आहात! साठवी माणसं सुद्धा किती ठणठणीत असतात! आरामात फिरत असतात ती. तब्येतीच्या विचारनं इतकी चिंता का करता?" असे म्हणून शंकरने गुरुनाथला धीर दिला. "चिंता करू नका, असं सहज म्हणालास खरं! पण मी किती अडचणींना तोंड देतोय, हे तुला काय माहीत? मला तर त्या सहन होत नाहीयेस, काय करावं हे सुचत नाहीये मला! या रोगांपासून वाचणं शक्य नाही असं वाटू लागलंय मला! अन् सगळं सहन तर करत राहावं लागणार नं!" त्याच्या बोलण्यात विषाद होता. असं वाटत होतं की तो आपली असहायता तीव्रपणे सोसतय.. "माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हे की तुम्ही या रोगांची पर्वाच करू नका. बेपर्वाई तर फार वाईट. एक माणूस विषबाधेने चाळीशीत मेला. एक बाई दरम्यान वारली, ती तर तीसचीही नव्हती! दोन्ही आमच्या गावचे बरं! पण आजार केवळ औषधानंच बरे नसतात, जीवनात काही आरोग्य-नियमांचं पालन करावं लागतं." शंकर म्हणाला. "सांग तर खरं-कोणत्या नियमांची माहिती आहे तुला?" गुरुनाथने विचारलं. "मी कधी बाहेरचं काही खात नाही. एखाद्या सणाला जास्तकमी खाल्लं, तर दुसऱ्या दिवशी उपास करतो मी! दररोज खूप दूरवर पायी फिरायला जातो; स्वतःची सगळी कामं स्वतःच करतो. जी कामं करतो, ती घाईगडबडीनं न करता सावकाश करतो. कसलीही काळजी करत बसत नाही. जे काही करतो, ते देवाचं नाव घेऊन करतो. आसपासच्या माणसांवर विश्वास ठेवतो. कोणी एकार्द भलं काम केलं तर आनंद वाटतो मला. कोणी माझं काही वाकडं केलं, तर त्यांच्यापासून दूर राहतो, पण त्याच्याबद्दल मनात सूडभावना नाही बाळगत मी. माझ्या दृष्टीने हीच तर सगळी आरोग्य-सूत्रे! यामुळे मी आजवर कधी आजारी पडलो नाही. मला वाटतं की, ज्या मार्गानं जातो, तो शुभदायक, सुखकारक आहे." शंकरने आपले विचार व्यक्त केले. "पण तू जे करतोस, त्या सर्वांची मी पालन करत असतोच की! कळत नाही, हे रोग माझ्यामागेच का लागलेत!" गुरुनाथ त्रासून बोलला. क्षणभर थांबून गुरुनाथ म्हणाला, "नीट विचार करून पहा, की मी जे-जे करतो, त्यातल तुम्ही काय करत नाही." खूप विचार करूनही आपण शंकरच्या आरोग्य सूत्रांचं पालन बरोबर करतो. असं वाटलं. तो म्हणाला, "आपल्या दोघांच्या आरोग्य-नियमांच्या पालनात काहीच फरक नाही. तरीही आणखी काही विशेष असेल तर सांग." "तुम्ही मोठे आहात माझ्याहून. माझे सख्खे मेहुणे आहेत. तुमच्या चुका काढणं बरं नव्हे, असं वाटतं मला. मर्यादा सोडणं बरं नव्हे ना. तेंव्हा आणखी कोणाला विचारून पहा." शंकर बोलला. गुरुनाथने प्रथम बायकोला याबद्दल विचारलं. नवऱ्याच्या चुकांवर बोट ठेवण तिला उचित वाटल नाही. मुलालाही विचारून पाहिलं, तर तो बोलायला कचरत होता. आपल्या नोकराला विचारलं, तर त्यानेही आपल्या वाक-चातुर्यानं स्वतःचा बचाव केला. हे सारं पाहून शंकर म्हणाला, "या लोकांना विचारलं, तर कोणी खरं सांगणार नाहीत, कारण ती सगळी आपलीच ना! जे वयानं तुमच्यापेक्षा मोठे असूनही ज्यांची प्रकृती उत्तम असेल त्यांना विचारा. वयानुसार आरोग्य नियम बदलत राहातात, हे तर सर्वांना ठाऊक आहे. मी पाळत असलेले नियम कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत; तुमच्या इच्छे विरुद्ध असतील. तेंव्हा कोणा वडिलांच्यायांना विचारणे उत्तम." अशा माणसाबद्दल गावच्या वैद्याशिवाय कोणाला माहिती असणं बरं? म्हणून गुरुनाथ वैद्याकडे गेला. "वैद्यराज, आपल्या गावात कोण सर्वात अधिक आरोग्य-शील, हे सांगू शकता तुम्ही?" त्यावर कोणतीही शंका न धरता वैद्यांनी सांगितलं, "या गावात शत्रुघ्नपेक्षा जास्त निरोगी कोणीही नाही. तो एक दिवसही कसल्याही औषधाच्या माझ्याकडे नाही." शत्रुघ्नने साठ ओलांडलीये; पण अजूनही तो एकादा दगडासारखा टणटणीत दिसतो. कुठे जायचं तर नेहमी पायीच जातो. लोक म्हणतात की त्याला कधी साधं पडसंही झालेलं नाही. वैद्यानं त्याचं नाव सुचवेपर्यंत आपल्याला शत्रुघ्न कसा आठवला नाही, याची गुरुनाथला शरम वाटली. तो त्याला भेटायला गेला. शत्रुघ्न गल्लीसमोर पारावर बसला होता अन् त्याला घेऊन गावची काही प्रमुख माणसं बसलेली होती. त्यांच्यातला एक जण शत्रुघ्नला म्हणाला, "माझ्या घरी गाण्याचा कार्यक्रम झाला, तुम्ही नाही आलात? तुमच्या वहिनीला फार वाईट वाटलं पहा." "नक्की आलो असतो, पण त्या दिवशी खूप खोकला येत होता. गाण्याला येऊन तिथे खोकत राहिलो असतो, तर इतरांना गंमत राहिली असती ना! मनात्या मनात शिव्या नसल्या दिल्या त्यांनी? म्हणून मुद्दामच नाही आलो. मधात तुळशीची पानं बुडवून खाल्ली-बास, खोकला गेला सुद्धा पळून!" आणखी एका माणसानं तक्रार केली, "शेजारगावी माझ्या भावाचं लग्न होतं. तुम्ही का नाही आलात?" शत्रुघ्नने सांगितलं, "मला जोरदार पडसं झालं होतं, शिंकाही येत होत्या खूप. लग्नासारख्या ठिकाणी शिंकणं अशुभ वाटतं ना, म्हणून नाही आलो." पुढं त्यानं आपण मिठाचा काढा पिऊन पडसं बरं केल्याचंही सांगितलं. शत्रुघ्न अशा प्रकारे तिथे उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या शंका दूर करत राहिला. उत्तरं ऐकून गुरुनाथला वाटलं, "अरे, आपल्यासारखेच सारे आजार शत्रुघ्नलाही घेतातच की! पण फरक इतकाच की, आपण वैद्याकडून औषध आणून घेतो, अन् घरगुती औषध घेत राहतो." सर्वजण निघून गेल्यावर शत्रुघ्नने गुरुनाथला म्हटलं, "हे, आता तुला कसली कैफियत देऊ?" "मला कसलीही कैफियत नकोय, मी तर तुझ्या बाबत जाणून घ्यायला आलो. खरोखर तुला इतके रोग झाले? की आलेल्या लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी खोटी कारणं देत राहिलास?" गुरुनाथनं विचारलं. "अरे, आत्ता-आत्ताच तू तर म्हणालास की तुला खोकला, पडसं, कानाचं दुखणं, पायात लचक वगैरे आजारांचा त्रास झाला? मी ते सर्व आपल्या कानांनी ऐकलंय. खरं सांग, तू कधी आजारी नाही पडलास?" आश्चर्याने गुरुनाथनं विचारलं. "अरे हे माणसाचं शरीर आहे बाबा! शरीर असेपर्यंत लहानमोठ्या कटकटी तर असतात-देबी, विषबाधा, हृदयविकार इत्यादी! हेच तर खरे रोग." शत्रुघ्न म्हणाला. त्याला प्रणाम करत गुरुनाथ म्हणाला, "माझी शंका दूर झाली. तुझ्या आरोग्याचं रहस्य हेच की, तू या लहानसहान आजारांना 'आजार' म्हणत नाहीस. मी उगीचच पराचा कावळा करून काळजीत पडतो, दुखण्याचा 'बाऊ' करतो. माझी चूक कळली मला!" शत्रुघ्न म्हणाला, "माझं जरा डोके दुखतंय. एक झोप काढली की ठीक होईल सगळं काही." इतकं बोलून तो घरात निघून गेला. गुरुनाथ मोठ्या उत्साहानं घरी परतला. यानंतर कधी-कधी त्याला डोके-दुखी, पडसं, खोकला, दातदुखणं वगैरेचा त्रास झाला, पण त्यानं त्याची कधी पर्वा केली नाही. त्याबाबत कधी कुणाला सांगितलंही नाही. त्यामुळे सर्वजण म्हणू लागले, "गुरुनाथची तब्येत सुधारलीय असं वाटतंय." शत्रुघ्नच्या उदाहरणावरून गुरुनाथने आरोग्याचे नियम बनवून टाकले: १. बारीक-सारीक दुखण्यांचा कधी 'बाऊ' करायचा नाही. २. कधी-कधी या दुखण्याकडे दुर्लक्ष करून आपले रोजचे व्यवहार चालू ठेवणं फायद्याचं असतं. ३. जरूर तिथे घरगुती औषधांचा वापर करून थोडी विश्रांती घ्यायची. ४. वयानुसार मानव-शरीराच्या काही तक्रारी चालू राहणारच. त्यांना फार महत्त्व देऊन 'आजार' असं म्हणायचंच नाही. ५. लचक वगैरे भरली तर लेप लावणं, चोळणं, शेकणं या उपायांनी बरं वाटू शकतं. लगेच वैद्याकडे धावायची गरज नाही. ६. मुख्य म्हणजे आपलं 'तारतम्य' बाळगायचं.