Get it on Google Play
Download on the App Store

मृत्युच्या दारात...

स्वप्नात एकदा मी 
बघितलं माझ्या मृत्युला,
गार झालं अंग अन 
नव्हते कुणी सोबतीला...

हौशीने घेतलेल्या घराचे 
नव्हते फिटले हप्ते चार,
एव्हढा कसा मी बिनधास्त
उघडेच ठेवले होते दार...

अचानक कसला तरी
गोंधळ एकदम उडाला,
उठून बसावं म्हणलं 
आलं कोण बघायला...

कुणी तरी गर्दीतुन
अंघोळ घाला म्हणत होतं,
तिरडी फुलांची 
सजवा म्हणत होतं...

वाजत गाजत एकदाची
स्मशान भूमी गाठली
रचलेल्या सरणावरती
पाठ माझी टेकली...

अचानक लागलेल्या आगीने
बरं झालं जाग आली
अन मरणा आधीच स्वप्नाने 
खाडकन डोळी उघडली....

संजय सावळे