Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण दुसरे - मैत्री

 सुधाकरने बेल वाजवली. 

"आले आले "असं म्हणत अश्विनीने दरवाजा उघडला.

 "हो मॅडम बोला. हो. अापण ठरवलं तसंच करुया. बीज कलर छान वाटेल त्या रुमला आणि हो मॅट फिनिशच असेल. हो. बरं. ठेवते." 

अश्विनीने फोन ठेवला.

 "अरे हि जेठमलानी किती दोकं फिरवते. आता म्हणतेय मला शनिवारी वेळ आहे तु ये. शनिवारी मी नाही काम करत तिला चोख सांगितलं मी."

 तक्रारीच्या सुरात अश्विनी सांगत होती. तिचा हा फोन कॉल होईपर्यंत सुधाकरने हातातले सामान अात रुममध्ये ठेवले होते.

"मी जरा फ्रेश होतो. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय."

 हे सांगत सुधाकर बाथरुम मध्ये गेला. अश्विनीने जेवणाची सगळी तयारी करुन ठेवली. डायनिंग टेबल वर येऊन बसली.

 "मी काय म्हणत होतो. तुला विकेंडला कुठे जायचंय??" सुधाकरने विचारलं

 "ठाण्यातुन बाहेर अगदी बदलापुरही चालेल..!" त्रासलेली अश्विनी म्हणाली.

 "अगं त्या जेठमलानीचं काय मनाला लाऊन बसतेस. मी खरच विचारतोय. शंतनु आणि मिता बरोबर जायचं का त्यांच्या फार्महाऊसवर..?"

 " आय्या पझेशन मिळालं पण त्यांना?" अश्विनीने विचारलं.

 "म्हणजे तुला माहिती होतं??"सुधाकर आश्चर्यचकित होउन म्हणाला.

 "हो मग अरे तिला इंटीरियरचं काम माझ्याकडुन करुन हवंय. माहिती ठेवावी लागते बाबा कस्टमरची." असं म्हणत तिने सुधाकरला डोळा मारला.

 "वाढा जेवायला इंटीरियर डिझाईनर मॅडम." दोघेही जेवले.

 आठवड्याभराच्या धावपळीमुळे त्यांना लवकर झोप लागली.

          सकाळी बेलच्या आवाजाने सुधाकर उठला. त्याने घड्याळ पाहिले. मोबाईल मध्ये नऊ मिसकॉल.

 "अरे देवा, शंतनुला सांगायला विसरलो." असं म्हणत त्याने रुम स्लिपर घातली आणि दाराशी गेला.

 दार उघडताच शंतनु दत्त बनुन समोर हजर , 

"साल्या सुध्या, सकाळी सहा पासुन कॉल करतोय. काल अश्विनीचा मेसेज आला मिताला काँग्रॅज्युलेशन फॉर न्यु होम..!! मला वाटलं तु सगळं सांगितलस आणि सकाळी याल बरोबर. काय यार तु..??" 

 अश्विनी डोळे चोळत हॉल मध्ये आली

. "अरे आज जायचं होतं.??" मिताकडे पाहुन म्हणाली. "हो मग चल आवर. नाश्ता रस्त्यात करु जाताना. आता काही करत बसु नकोस." मिता म्हणाली. 

दोघांनी पटापट आवरले. "सगळं घेतलंस ना? मोबाईल, पर्स वगैरे..!!" अश्विनी म्हणाली.

 "हो.. येस.. डन.. कुलुप लाव मी जातो खाली." सुधाकर गेला. शेवटी त्यांना घरातुन निघायला आठ वाजलेच